(India : ठिकाण बदला)

नेहमी विचारले जाणारे प्रश्न


क्लास ऍक्शनचा खटला म्हणजे काय ?

क्लास ऍक्शनचा खटला म्हणजे असा खटला की ज्यामध्ये काही प्रातिनिधिक वादी स्वतःच्या व त्यांच्यासारख्याच परिस्थितीतील अन्य व्यक्तींच्या वतीने प्रतिवादींविरुद्ध खटला चालवतात. असे प्रातिनिधिक वादी, न्यायालय व क्लासचे प्रतिनिधित्व करणारे वकील, अशा सर्वांवर हे पाहण्याची जबाबदारी असते की क्लासच्या सर्व सदस्यांच्या हितसंबंधांचे पुरेसे प्रतिनिधित्व होत आहे. महत्वाचे म्हणजे क्लासचे सदस्य हे क्लासच्या वकिलांच्या फीसाठी अगर खटल्याचा खर्चासाठी वैयक्तिकरीत्या जबाबदार नसतात. क्लास ऍक्शनमध्ये वकिलांच्या फी अगर खटल्याचा खर्च तोडग्याच्या निधीमधून दिले जातात व त्यांना न्यायालयाची मान्यता मिळावी लागते.

Lufthansa बरोबरच्या या तोडग्यासारख्या प्रस्तावित समझोत्याचा करार जेव्हा क्लास प्रतिवादीबरोबर करतो, तेव्हा क्लासला नोटीस दिली जाणे व त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाणे न्यायालयाच्या दृष्टीने आवश्यक असते. मग न्यायालय इतर गोष्टींबरोबरच प्रस्तावित तोडगा न्याय्य, योग्य व पुरेसा आहे वा नाही हे ठरवण्यासाठी सुनावणी घेते.

(परत वर जा)

कशाच्या संबंधातील हे तोडगे आहेत ?

अमेरिकन सेटलमेंट:

या ऍक्शनमध्ये वादींचा आरोप आहे, की Lufthansa व अन्य प्रतिवादींनी हवाई मालवाहतूक सेवेचे दर परस्परसंमतीने अधिभार (अधिभार म्हणजे हवाई मालवाहतुकदार सामान्य हवाई मालवाहतूक दरांव्यतिरिक्त जे अधिक भार, विशिष्ट अतिरिक्त खर्चांपोटी लावतात, ते, उदाहरणार्थ, “इंधन अधिभार” अगर “सुरक्षा अधिभार”) आकारुन ठरवणे, वाढवणे, तसेच राखणे अगर स्थिर ठेवणे यासाठी एकत्र येऊन संगनमत केले, व ज्यात वाढीव अधिभार आकारणे, हवाई मालवाहतुक सेवेच्या दरांमध्ये सूट देणे बंद करणे अगर रोखणे, परतावा आणि ग्राहकांच्या विभागणीबद्दल समझोता करणे या गोष्टी परस्परसंमतीने ठरवल्या व या सर्वांद्वारे अमेरिकेच्या antitrust law (मक्तेदारीविरोधी कायदा) व state law (राज्य कायदा) चा भंग केला. वादींचा आरोप आहे की या कथित वर्तनाचा परिणाम म्हणून क्लासला हवाई मालवाहतूक सेवांसाठी या वर्तनाच्या अनुपस्थितीत जो खर्च आला असता, त्यापेक्षा जास्त खर्च आला.

“एअरफ्रेट शिपींग सेवा” ची व्याख्या म्हणजे अमेरिकेअंतर्गत, अमेरिकेमध्ये जाणारी अगर अमेरिकेमधून बाहेर येणारी हवाई मालवाहतुक सेवा.

Lufthansaच्या जोडीला, या खटल्यात बचाव पक्ष असलेल्यांची नावे येथे आढळतीलसूचना.

कॅनेडियन सेटलमेंट:

सध्या तीन वेगवेगळ्या कॅनेडियन न्यायालयांमध्ये Lufthansaविरुद्ध क्लास ऍक्शन खटले प्रलंबित आहेत: Supreme Court of British Columbia (ब्रिटिश कोलंबियाचे सर्वोच्च न्यायालय) , Ontario Superior Court of Justice (ओंटारिओचे सुपीरियर न्यायालय) , आणि Québec Superior Court (क्युबेकचे सुपीरियर न्यायालय) (एकत्रितपणे, “कॅनेडियन क्लास ऍक्शंस”) . वादींचा आरोप आहे, की Lufthansa व अन्य प्रतिवादींनी हवाई मालवाहतुक सेवेचे दर ठरवणे, वाढवणे, तसेच राखणे अगर स्थिर ठेवणे यासाठी एकत्र येऊन संगनमत केले, ज्यात वाढीव अधिभार आकारणे, हवाई मालवाहतुक सेवेच्या दरांमध्ये सूट देणे बंद करणे अगर रोखण्याचे आपसात ठरवणे, व परतावा आणि ग्राहकांच्या विभागणीबद्दल समझोता करणे अंतर्भूत आहे. वादींचा आरोप आहे, की यामुळे त्यांना व कॅनेडियन क्लासच्या सदस्यांना, अशा तथाकथित वर्तनाच्या अनुपस्थितीमध्ये जेवढे खर्च करावे लागले असते, त्यापेक्षा हवाई मालवाहतुक सेवेसाठी मोठ्या प्रमाणावर जास्त पैसे खर्च करावे लागले.

कॅनेडियन क्लास ऍक्शंसचा संबंध मुख्यतः प्रतिवादींनी अतिरिक्त प्रमाणात लावलेल्या अधिभारांशी आहे. अधिभार म्हणजे हवाई मालवाहतुकदार सामान्य हवाई मालवाहतुक दरांव्यतिरिक्त जे अधिक भार, संभवतः हवाई मालवाहतुकदारांना येत असलेल्या बाह्यस्थित खर्चांपोटी ग्राहकांना लावतात, ते, ज्यात अंतर्भूत आहेत, उदाहरणार्थ, वाढीव इंधनखर्च अगर अमेरिकेत सप्टेँबर 2001 मध्ये झालेल्या हल्ल्यांनंतर अतिरिक्त सुरक्षेसाठीचा वाढीव खर्च. वादींचा आरोप आहे, की प्रतिवादींनी या अधिभारांचे दर निश्चित करण्यासाठी तसेच प्रतिवादींनी जमवलेले उत्पन्न निश्चित करण्यासाठी संगनमत केले.

(परत वर जा)

सेटलमेंट क्लासेसचा कोण सदस्य आहे ?

अमेरिकन सेटलमेंट:

एप्रिल 4, 2008, च्या हुकुमानुसार न्यायालयाने प्राथमिकरीत्या Lufthansa समझोत्याचा क्लास प्रमाणित केला व आदेश दिला, की Lufthansa समझोत्याच्या क्लासच्या (“Lufthansa समझोत्याच्या क्लासचे सदस्य”) व्याख्येत बसणा-या व्यक्ती व संस्थांना ही सूचना पाठवली जावी. Lufthansa समझोत्याच्या क्लासची व्याख्या अशी आहे:

ज्यांनी फ्रेट फॉरवर्डर्समार्फत हवाई मालवाहतूक सेवा खरेदी केल्या असतील त्यांच्यासह अशा सर्व व्यक्ती व संस्था ज्यांनी जानेवारी 1, 2000 ते सप्टेंबर 11, 2006 या कालावधीमध्ये, कोणत्याही हवाई मालवाहतुकदाराकडून, आणि/किंवा कोणाही नमूद केलेल्या अगर न केलेल्या सहभागींसह (एकत्रितरीत्या “प्रतिवादी”) अमेरिकेअंतर्गत केलेल्या, अमेरिकेमध्ये गेलेल्या अगर अमेरिकेमधून बाहेर पडलेल्या मालवाहतुकीसाठी हवाई मालवाहतुक सेवा (यापुढे “हवाई मालवाहतूक सेवा”) खरेदी केल्या होत्या (अमर्यादितपणे विशेषतः Lufthansa सहित ऍक्शंसमध्ये नमूद केलेल्या सर्व प्रतिवादींसह) . समझोत्याच्या क्लास(क्लासेस) मध्ये प्रतिवादी व त्यांचे मूळ कंपन्या, कर्मचारी, उपकंपन्या, संबंधित अधिकारी व सर्व सरकारी कंपन्या समाविष्ट नाहीत.

कृपया लक्षात घ्या, की Lufthansa तोडग्याचा क्लास हा ऍक्शनमध्ये व्याख्या केलेल्या प्रस्तावित क्लासपेक्षा वेगळा आहे. ऍक्शनमध्ये प्रतिवादी म्हणून नमूद न केलेल्या हवाई मालवाहतुकदारांसहित कोणत्याही हवाई मालवाहतुकदाराकडून सेवा खरेदी केलेल्या व्यक्ती Lufthansa तोडग्याच्या क्लासमध्ये समाविष्ट आहेत.

कॅनेडियन सेटलमेंट:

कॅनेडियन समझोता करारामुळे तीन समझोत्याचे क्लासेस निर्माण होतात. समझोत्याचा प्रत्येक क्लास एका न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात येतो. त्यामुळे, ब्रिटिश कोलंबियातील निवासी वैधानिक व नैसर्गिक व्यक्ती ब्रिटिश कोलंबियाच्या समझोता क्लासमध्ये व Supreme Court of British Columbia (ब्रिटिश कोलंबियाचे सर्वोच्च न्यायालय) च्या अधिकारक्षेत्रात येतील ; क्युबेकमधील निवासी वैधानिक व नैसर्गिक व्यक्ती (यात 50 अगर कमी कर्मचारी असलेल्या कंपन्या अंतर्भूत आहेत) क्युबेकच्या समझोता क्लासमध्ये व Québec Superior Court (क्युबेकचे सुपीरियर न्यायालय) च्या अधिकारक्षेत्रात येतील ; आणि ब्रिटिश कोलंबियाच्या समझोता क्लासमध्ये अगर क्युबेकच्या समझोता क्लासमध्ये सदस्य असलेल्या वैधानिक व नैसर्गिक व्यक्ती सोडून इतर वैधानिक व नैसर्गिक व्यक्ती ओंटारिओच्या समझोता क्लासमध्ये व Ontario Superior Court of Justice (ओंटारिओचे सुपीरियर न्यायालय) च्या अधिकारक्षेत्रात येतील.

ब्रिटिश कोलंबियाचा तोडगा क्लास, क्युबेकचा तोडगा क्लास व ओंटारिओच्या तोडगा क्लासमध्ये एकत्रितरीत्या अंतर्भूत आहेत:

ज्यांनी मालाच्या अग्रेषकांमार्फत हवाई मालवाहतुक सेवा खरेदी केल्या असतील त्यांच्यासह अशा सर्व व्यक्ती व संस्था ज्यांनी जानेवारी 1, 2000 ते सप्टेंबर 11, 2006 या कालावधीमध्ये अमर्यादितपणे विशेषतः Lufthansa सहित सर्व प्रतिवादींसह कोणत्याही हवाई मालवाहतुकदाराकडून, कॅनडाअंतर्गत, कॅनडामध्ये अगर कॅनडामधून मालवाहतुकीसाठी (कॅनडा व अमेरिका यादरम्यानची मालवाहतुक वगळून) हवाई मालवाहतुक सेवा खरेदी केल्या होत्या. समझोत्याच्या क्लास(क्लासेस) मध्ये प्रतिवादी व त्यांचे मूळ कंपन्या, कर्मचारी, उपकंपन्या, संबंधित, अधिकारी व संचालक समाविष्ट नाहीत.

तोडग्याच्या कालावधीमध्ये केलेली, अमेरिका व कॅनडादरम्यानच्या हवाई मालवाहतुकीसाठीची सेवांची खरेदी ही अमेरिकन तोडगा करारांतर्गत येते व कॅनेडियन तोडगा करारांतर्गत येत नाही. जर आपण अमेरिका व कॅनडादरम्यान हवाई मालवाहतुकीसाठी हवाई मालवाहतुक सेवांची खरेदी केली असेल तर आपण अमेरिकन क्लास ऍक्शनचे सदस्य आहात व आपण आपल्या अधिकारांवर कसा परिणाम होतो हे पाहण्यासाठी प्रस्तावित क्लास ऍक्शनच्या अमेरिकन तोडगा कराराची नोटीस वाचली पाहिजे.

(परत वर जा)

प्रस्तावित तोडगे काय आहेत ?

अमेरिकन सेटलमेंट:

प्रस्तावित Lufthansa समझोता कराराचे खालील वर्णन म्हणजे फक्त गोषवारा आहे. The अमेरिकन. Lufthansa तोडगा करार (करण्यात आलेल्या चार दुरूस्त्यांसह) या वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि अमेरिकन न्यायालयाकडे असलेल्या फाईलवर.येथे सूचनेत निर्देशित केलेल्या पत्त्यावर आहे.

Lufthansa समझोत्याच्या क्लासच्या वतीने वादींनी Lufthansa करार केला. Lufthansa ने 85 दशलक्ष डॉलर (अधिक जमा झालेले व्याज) देण्याचे व समझोत्याच्या क्लासच्या वकिलांना अन्य प्रतिवादींविरुद्ध खटले सुरु ठेवण्यासाठी सहकार्य देण्याचे मान्य केले आहे. ऍक्शनमध्ये Lufthansa समझोत्याच्या क्लासच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व दाव्यांमधून Lufthansa ला मुक्त केले जाईल. ऍक्शन समझोता न करणा-या प्रतिवादींविरुद्ध कारवाई सुरु ठेवेल. ऍक्शन समझोता न करणार्या प्रतिवादींविरुद्ध कारवाई सुरु ठेवेल. तसेच ऍक्शन Lufthansa विरुद्ध, Lufthansa समझोता कराराच्या अटींनुसार मुक्त न झालेल्या सर्व आरोपित दाव्यांच्या बाबतीतही कारवाई सुरु ठेवेल.

कॅनेडियन सेटलमेंट:

प्रस्तावित Lufthansa समझोता कराराचे खालील वर्णन म्हणजे फक्त गोषवारा आहे. संपूर्ण कॅनेडियन Lufthansa तोडगा करार या वेबसाईटवर उपलब्ध आहे. कॅनेडियन समझोता कराराच्या मर्यादेमध्ये Lufthansaने कॅनेडियन समझोत्याच्या क्लासेसच्यासाठी समझोता निधीमध्ये 5,338,00 अमेरिकन डॉलर देण्याचे मान्य केले आहे. कॅनेडियन समझोता कराराच्या अटींनुसार Lufthansa कॅनेडियन समझोत्याच्या क्लासच्या वकिलांना आणि/किंवा त्यांच्या तज्ञांना, ज्यामध्ये अमेरिकन समझोत्याच्या क्लासचे वकील अमेरिकन समझोता कराराच्या अटींनुसार भाग घेतात जे कॅनेडियन समझोत्याच्या क्लासच्या वकिलांच्या मते संबंधित कालावधीमध्ये कॅनडाअंतर्गत, कॅनडामध्ये अगर कॅनडामधून चालणार्या हवाई मालवाहतुक सेवांशी संबंधित असेल अशा कोणत्याही कामकाज, अभिसाक्ष्य, वकिलांच्या बैठका व मुलाखतींमध्ये सहभाग घेण्यचे अधिकार देते. Lufthansaने अमेरिकन समझोत्याच्या क्लासच्या वकिलांना जे काही सहकार्यात्मक साहित्य अगर माहिती पुरवली असेल वा पुरवील, अशी सर्व माहिती अगर साहित्य मिळण्याचा कॅनेडियन समझोत्याच्या क्लासेसना अधिकार आहे. याशिवाय Lufthansa कॅनेडियन समझोत्याच्या करारामध्ये दिलेल्या विशिष्ट अटींनुसार स्वखर्चाने आपले सध्याचे अगर माजी संचालक, अधिकारी व कर्मचारी मुलाखती, निवेदने आणि/किंवा प्रतिज्ञापत्रे, अभिसाक्ष्य व साक्षीसाठी खटल्याच्या वेळी पुरवेल. Lufthansa आपले माजी संचालक, अधिकारी व कर्मचारी मुलाखती, निवेदने आणि/किंवा प्रतिज्ञापत्रे, अभिसाक्ष्य व साक्षीसाठी उपस्थित ठेवण्याचे सर्व योग्य प्रयत्न करेल.

(परत वर जा)

अमेरिकन तोडग्यात प्लॅन ऑफ ऍलोकेशन काय आहे ?

न्यायालयाने तोडगा निधीच्या वाटणीची योजना मान्य केली आहे (Lufthansa तोडग्याच्या सदस्यांना न्यायालयाने मान्य केलेली वकिलांची फी व खटल्याचा खर्च परत देऊन ; Lufthansa समझोता निधीच्या कर व करसंबंधी खर्च काही असल्यास देऊन ; या नोटीसमधील भाग II नुसार वजावटी करुन ; आणि समझोता कराराच्या परिच्छेद 61 नुसार काही आर्बिट्रेशन खर्च असल्यास ते देऊन बाकी रक्कम) . प्लॅन ऑफ ऍलोकेशन "POA" (पीओए) चा सारांश येथे सूचनेत देण्यात आलेला आहे.

Lufthansa समझोता निधीची वाटणी (वर दिल्यानुसार न्यायालयाने मान्य केलेली वकिलांची फी व खटल्याचा खर्च परत देऊन व अन्य प्रमाणित खर्च दिल्यावर) Lufthansa क्लासचे जे सदस्य वैध दाव्यांची प्रपत्रे सादर करतील त्यांमध्ये कसा वाटावा ते पीओए नेमून देते. POA (पीओए) मध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अशा दोन्ही हवाई मालवाहतूक सेवांचा विचार केला आहे. “हवाई मालवाहतूक सेवा” ची व्याख्या म्हणजे अमेरिकेअंतर्गत, अमेरिकेमध्ये गेलेली अगर अमेरिकेमधून बाहेर पडलेली हवाई मालवाहतुक सेवा. कोणाही Lufthansa क्लासच्या सदस्याच्या वसुलीच्या प्रमाणानुसार वाट्याचा हिशोब करण्यासाठी डॉलर सोडून अन्य चलनांमध्ये केलेल्या खरेदीच्या रकमांचे रुपांतर सप्टेंबर 11, 2006 रोजी असलेल्या दरांनुसार डॉलरमध्ये केले जाईल.

POA (पीओए), बाबतच्या अधिक तपशीलासाठी कृपया याचा सूचनेचा आढावा घ्या.

(परत वर जा)

अमेरिकन तोडग्यात मी दावा कसा सादर करावयाचा आहे ? दावा सादर करण्याची अंतिम मुदत काय आहे ?

जर आपण अमेरिकन तोडग्यासाठी वर वर्णन केलेल्या Lufthansa तोडगा क्लासच्या व्याख्येत बसणारी व्यक्ती वा संस्था असाल आणि तोडग्यात सहभागी होऊ इच्छित असाल, तर आपल्याला दावा प्रपत्र भरलेच पाहिजे.

आपल्याला ही नोटीस टपालाने मिळाली असल्यास या नोटीसबरोबर आपल्याला दाव्याचे प्रपत्र आधीच मिळाले आहे. आपण ही नोटीस ऑनलाईन वाचत असल्यास अगर तिची प्रत आपल्याला Air Cargo Settlement (हवाई मालवाहतूक समझोत्याच्या) दाव्यांच्या प्रशासकांकडून टपालाऐवजी अन्य मार्गाने मिळाली असल्यास आपण दाव्याचे प्रपत्र वर ऑनलाईन मागवू शकता अगर Air Cargo Settlement (हवाई मालवाहतूक समझोत्याच्या) दाव्यांच्या प्रशासकांना दूरध्वनी करुन मागवू शकता: अमेरिका व कॅनडा. (टोल-मुक्त) येथे 1 (800) 749-3518 ; किंवा आंतरराष्ट्रीय (टोल) येथे 1 (941) 906-4822. येथे Air Cargo Settlement (हवाई मालवाहतूक समझोत्याच्या) ची टोल-मुक्त आणि टोल-युक्त क्रकमांकांची देशवार यादी उपलब्ध आहे.

भरलेली दाव्याची प्रपत्रे हवाई मालवाहतूक समझोता च्या दावे प्रशासकाला या पत्त्यावर परत पाठ्वावी: Air Cargo Settlement, c/o The Garden City Group, Inc., P.O. Box 9162, Dublin, OH 43017-4162, USA. दावा प्रपत्रांवर फेब्रुवारी 12, 2009 नंतरचा पोस्टमार्क नसला पाहिजे. जर आपण वेळेच्या आत, योग्यरीत्या पत्ता भरलेले दावा प्रपत्र पाठवण्यात अयशस्वी झालात, तर आपला दावा नाकारला जाऊ शकतो आणि आपल्याला Lufthansa तोडगा निधीच्या कोणत्याही हिश्श्यापासून वंचित राहावे लागू शकेल.

(परत वर जा)

तोडगे मान्य करून मी कोणते हक्क सोडून देत आहे ?

अमेरिकन सेटलमेंट:

आपण जर स्वतःला Lufthansa तोडगा क्लासमधून निष्कासित केले नाही, तर जेव्हा Lufthansa तोडगा करार अंतिम स्वरुप घेईल तेव्हा आपण सूचनेमध्ये वर्णन केलेल्या, सर्व दाव्यांमधून Lufthansa ला मुक्त केले असेल आणि आपल्यावर Lufthansa तोडगा करारातील मुक्तता बंधनकारक ठरेल जरी आपण दाव्याचे प्रपत्र सादर केले नाही अगर Lufthansa तोडग्याच्या निधीमध्ये सहभागी नसाल तरी.

Lufthansa च्या 85 कोटी डॉलरच्या अदायगीच्या(Lufthansa तोडग्याच्या क्लासचे जे सदस्य स्वतःला निष्कासित करतील त्यांच्यासाठी ही रक्कम कमी होऊ शकते) व Lufthansa च्या भरघोस सहकार्याच्या बदल्यात Lufthansa तोडग्याच्या सदस्यांवर, तोडगा करारात दिल्यानुसार व सूचनेमध्ये वर्णन केलेल्या सर्व दाव्यांमधून Lufthansa ला मुक्त करण्याचे बंधन असेल.

कॅनेडियन सेटलमेंट:

आपण जर स्वतःला कॅनेडियन क्लास ऍक्शंसमधून निष्कासित केले नाही, तर जेव्हा तोडगा करार अंतिम स्वरुप घेईल तेव्हा आपण या प्रकरणाशी संबंधित सर्व दाव्यांमधून Lufthansa ला मुक्त कराल आणि आपल्यावर ही मुक्तता व/किंवा कॅनेडियन तोडग्याच्या करारातील खटला न भरण्याविषयीचे प्रतिज्ञापत्र बंधनकारक असेल. क्युबेक समझोत्याच्या क्लास सदस्यांपैकी ज्यांनी कायदेशीर कारवाई सुरु केली असेल अगर सुरु करतील व क्युबेक क्लासमधून निष्कासनाच्या अंतिम मुदतीच्या आत अशी कारवाई बंद करु शकणार नाहीत, त्यांनी स्वेच्छेने माघार घेतली असे गृहित धरले जाईल.

कॅनेडियन तोडग्याच्या करारातील अंतर्भूत मुक्तता पुढे सूचनेत दिली आहे:

(परत वर जा)

तोडग्यांमध्ये प्रतिवादींचे प्रतिनिधीत्व कोण करीत आहे ?

Deutsche Lufthansa AG, Lufthansa Cargo AG, आणि Swiss International Air Lines Ltd. साठीचे अमेरिकन वकील

Eric J. Mahr
Natalya K. Scimeca
WILMER CUTLER PICKERING HALE AND DORR LLP
1875 Pennsylvania Avenue, N.W.
Washington, D.C. 20006

Deutsche Lufthansa Cargo AG, आणि Swiss International Air Lines Ltd. साठीचे कॅनेडियन वकील:

Robert E. Kwinter
Blake, Cassels & Graydon LLP
199 Bay Street
Suite 2800, Commerce Court West
Toronto, ON M5L 1A9

(परत वर जा)

तोडग्यांमध्ये सेटलमेंट क्लासेसचे प्रतिनिधीत्व कोण करीत आहे ?

तोडग्याच्या क्लासचे वकील:

Michael D. Hausfeld
HAUSFELD LLP
1700 K Street, NW
Suite 650
Washington, DC 20006

Robert N. Kaplan
KAPLAN FOX & KILSHEIMER LLP
850 Third Avenue
New York, NY 10022

Henry A. Cirillo
THE FURTH FIRM LLP
225 Bush Street, 15th Floor
San Francisco, CA 94104

Steven N. Williams (SW-6198)
COTCHETT, PITRE & MCCARTHY
840 Malcolm Road, Suite 200
Burlingame, CA 94010
Hollis Salzman
LABATON SUCHAROW LLP
140 Broadway
New York, NY 10005

Howard J. Sedran
LEVIN, FISHBEIN, SEDRAN & BERMAN
510 Walnut Street
Philadelphia, PA 19106

W. Joseph Bruckner
LOCKRIDGE GRINDAL NAUEN P.L.L.P.
100 Washington Avenue South, Suite 2200
Minneapolis, MN 55401

Christopher Lovell
LOVELL STEWART HALEBIAN LLP
500 Fifth Avenue, Suite 58
New York, NY 10110

कॅनेडियन सेटलमेंट क्लास सह-वकील:

Charles M. Wright
Siskinds LLP
680 Waterloo Street
London, ON N6A 3V8

क्युबेक तोडग्याचे क्लास वकील:

Irwin Liebman
Liebman Associés
1 Westmount Square #1500
Montreal, Québec H3Z 2P9

(परत वर जा)

सेटलमेंट क्लासेसमधून मी स्वतःला कसा बाहेर काढू शकतो ?

अमेरिकन तोडगा:

Lufthansa समझोत्याच्या क्लासमधून स्वतःला निष्कासित करण्यासाठी आपल्याला एक लेखी विनंती पाठवावी लागेल, ज्यात खालील गोष्टी स्पष्ट असाव्या:

  • आपले नाव, पत्ता व दूरध्वनी क्रमांक ;
  • आपण अगर आपल्या व्यवसायाने वापरलेली सर्व व्यापारी नावे वा व्यावसायिक नावे व पत्ते, तसेच अशा सर्व मूळ कंपन्या, उपकंपन्या अगर संबंधित कंपन्या ज्यांनी जानेवारी 1, 2000 ते सप्टेंबर 11, 2006 या कालावधीमध्ये कोणत्याही वेळी हवाई मालवाहतुक सेवा खरेदी केल्या आहेत तसेच समझोत्याच्या क्लासेसमधून समाविष्टी मागे घेण्याची विनंती करत आहेत ;
  • ऍक्शनचे नाव (In re Air Cargo Shipping Services Antitrust Litigation) (हवाई मालवाहतुक सेवांच्या मक्तेदारीविरोधीच्या खटल्यामध्ये) ;
  • “मी/आम्ही विनंती करतो की मला/आम्हाला Air Cargo Shipping Services Antitrust Litigation, MDL 1775 (हवाई माल वाहतुक सेवांच्या मक्तेदारीविरोधी खटला, MDL 1775)" ; Lufthansa तोडग्याच्या क्लासमधून काढले जावे” असे स्वाक्षरी केलेले निवेदन ; व
  • आपल्याला विनंती करण्यात येते की आपण जानेवारी 1, 2000 ते सप्टेंबर 11, 2006 या कालावधीमध्ये कोणत्या हवाई मालवाहतुकदारांकडून हवाई मालवाहतूक सेवा खरेदी केल्या आहेत हे कळवावे व हवाई मालवाहतूक सेवांसाठी एकूण किती रक्कम खर्च केली याचा अंदाज करावा.

Lufthansa समझोत्यामधून निष्कासित करण्याच्या विनंत्या फर्स्ट क्लास टपालाने येथे पाठवाव्या (सर्टिफाईड टपालाने आपण निष्कासित करण्याच्या विनंत्या पाठवाव्या अशी आपल्याला विनंती करण्यात येत आहे, पण तसे बंधनकारक नाही) , त्यावर नोव्हेँबर 12, 2008 नंतरचा पोस्टमार्क नसावा:

Air Cargo Settlement
c/o The Garden City Group, Inc.
P.O. Box 9162
Dublin, OH 43017-4162 USA

Lufthansa समझोत्याच्या क्लासमधून निष्कासित केले जाण्यासाठी आपण जरी या खटल्याचा विषय असलेल्या कृतीमधून उत्पन्न होणार्या दाव्यांवर आधारुन कोणत्याही प्रतिवादींविरुद्ध खटला दाखल केला असेल अगर करावयाचा असेल, तरी येथे दिल्यानुसार वेळेवर निष्कासनाची विनंती आपण केली पाहिजे.

आपण स्वतःला Lufthansa समझोत्याच्या क्लासमधून निष्कासित केले तर आपणावर Lufthansa समझोता करार बंधनकारक राहणार नाही व आपण Lufthansa च्या विरोधातील सर्व दाव्यांचा पाठपुरावा स्वतंत्रपणे, आपल्या खर्चाने करु शकता. मात्र आपण स्वतःला निष्कासित केले तर आपण Lufthansa समझोता निधीमध्ये वाटा मागू शकणार नाही.

कॅनेडियन सेटलमेंट:

आपण जर “स्वेच्छेने माघार” घेतली नाही, तर कॅनेडियन समझोता कराराला मान्यता मिळाल्यास त्याच्या अटी आपल्यावर बंधनकारक होतील. आपण कॅनेडियन समझोता क्लासेसमध्ये राहण्याचे ठरवले व माघार घेतली नाही, तर आपण Competition Act (स्पर्धाविषयक कायदा) च्या भंगाच्या आरोपाखाली कोणतेही दावे अथवा कायदेशीर कारवाई लावू अगर सुरु ठेवू शकणार नाही, जसे दर ठरवणे, हवाई मालवाहतुकीसंबंधी बाजारातील कथित वर्तनाबद्दल कोणतेही दावे लावू अगर सुरु ठेवू शकणार नाही. भविष्यात कॅनेडियन क्लास ऍक्शंसमधून माघार घेण्याचा कोणताही अधिकार दिला जाणार नाही. आपण कॅनेडियन क्लास ऍक्शंसमधून माघार घेतल्यास आपल्याला कॅनेडियन समझोता करार अथवा समझोता न करणार्या प्रतिवादींविरुद्ध भविष्यात मिळवलेल्या पुढील अन्य कोणत्याही निर्धारण अगर निर्णयामध्ये सहभागी होता येणार नाही.

ओंटारिओ आणि/किंवा ब्रिटिश कोलंबिया समझोत्याचे क्लासेस:आपल्याला यापैकी एखाद्या क्लासमधून माघार घ्यावयाची असल्यास आपण त्यासाठी खालील पत्त्यावर नोव्हेंबर 12, 2008 पूर्वी पोस्टमार्क केलेल्या सर्टिफाईड, पोचपावती मागवून, टपालखर्च आधी देऊन, पाठवलेल्या टपालाने तशी लेखी विनंती पाठवली पाहिजे:

Air Cargo Settlement
c/o The Garden City Group, Inc.
P.O. Box 9162
Dublin, OH 43017-4162 USA

क्युबेक समझोत्याचा क्लास: आपल्याला क्युबेक समझोत्याच्या क्लासमधून माघार घ्यावयाची असल्यास आपण त्यासाठी खालील पत्त्यावर नोव्हेंबर 12, 2008 पूर्वी पोस्टमार्क केलेल्या सर्टिफाईड, पोचपावती मागवून, टपालखर्च आधी देऊन, पाठवलेल्या टपालाने तशी लेखी विनंती पाठवली पाहिजे:

Clerk of the Superior Court of Québec
1 Notre-Dame Street East
Montréal, Québec H2Y 1B6

आवश्यक माहिती: कॅनेडियन क्लास ऍक्शंसमधून माघार घेण्याच्या सर्व विनंत्यांमध्ये खालील माहिती स्पष्ट दिलेली असली पाहिजे:

  • आपले नाव, पत्ता व दूरध्वनी क्रमांक
  • आपण अगर आपल्या व्यवसायाने वापरलेली सर्व व्यापारी नावे वा व्यावसायिक नावे व पत्ते, तसेच अशा सर्व मूळ कंपन्या, उपकंपन्या अगर संबंधित कंपन्या ज्यांनी संबंधित कालावधीमध्ये कोणत्याही वेळी हवाई मालवाहतुक सेवा खरेदी केल्या आहेत तसेच समझोत्याच्या क्लासेसमधून समाविष्टी मागे घेण्याची विनंती करत आहेत
  • प्रकरणाचे नाव (Canadian Air Cargo Shipping Services Class Actions) (कॅनेडियन हवाई माल वाहतुक सेवाविषयक क्लास ऍक्शंस)
  • ज्यांमधून आपल्याला माघार घ्यायची आहे तो/(ते) क्लास/(क्लासेस)
  • आपण जानेवारी 1, 2000 व सप्टेंबर 11, 2006 दरम्यान खरेदी केलेल्या सर्व हवाई माल वाहतुक सेवांचे मूल्य
  • “मी/आम्ही विनंती करतो की मला आम्हाला Canadian Air Cargo Shipping Services Class Action(कॅनेडियन हवाई माल वाहतुक सेवाविषयक क्लास ऍक्शंस) मधील प्रस्तावित समझोत्याच्या क्लासमधून काढले जावे” असे स्वाक्षरी केलेले निवेदन.

कॅनेडियन क्लास ऍक्शंसमधून निष्कासित केले जाण्यासाठी, जरी आपण स्वतः या खटल्यातील वर्तनामुळे निर्माण झालेल्या विषयांच्या आधारे प्रतिवादींपैकी कोणावरही खटला दाखल केला असला अगर आपल्याला करायचा असला, तरी आपण वर दिल्याप्रमाणे वेळेवर निष्कासनाची विनंती केली पाहिजे. क्युबेक समझोत्याच्या क्लास सदस्यांपैकी ज्यांनी कायदेशीर कारवाई सुरु केली असेल अगर सुरु करतील व क्युबेक क्लासमधून निष्कासनाच्या अंतिम मुदतीच्या आत अशी कारवाई बंद करु शकणार नाहीत, त्यांनी स्वेच्छेने माघार घेतली असे गृहित धरले जाईल.

(परत वर जा)

मी काहीही न केल्यास काय ?

Lufthansa समझोत्याच्या क्लासमधून आपण स्वतःला निष्कासित केले नाही व दाव्याचे प्रपत्र सादर केले नाही, तर आपण तर Lufthansa समझोता निधीमधून पैसे मिळण्यास पात्र उरणार नाही व आपण Lufthansa ला मुक्ततेमधे वर्णिलेल्या सर्व दाव्यांमधून मुक्त कराल.

(परत वर जा)

अंतिम मान्यता सुनावण्या केव्हा व कोठे आहेत ?

अमेरिकन सेटलमेंट:

न्यायालयाने United States District Court for the Eastern District of New York (अमेरिकन जिल्हा न्यायालयाच्या न्यूयॉर्क पूर्व जिल्ह्याचे न्यायालय) साठी डिसेंबर 12, 2008 रोजी सकाळी 11:30 वाजता दी सेरिमोनियल न्यायदालन, United States Courthouse, 225 Cadman Plaza East, Brooklyn, NY 11201 येथे “निःपक्षपाती सुनावणी” घ्यावयाचे ठरविले आहे. या निःपक्षपाती सुनावणीच्या वेळी प्रस्तावित Lufthansa समझोता करार न्याय्य, योग्य व पुरेसा आहे अगर नाही यावर विचार केला जाईल.

कॅनेडियन सेटलमेंट:

कॅनडामध्ये करार लागू होण्यासाठी प्रत्येक न्यायालयाने कॅनेडियन समझोता करार मान्य करावा लागेल. कॅनेडियन समझोता करार मान्य करण्यासाठीच्या प्रस्तावावर Ontario Superior Court of Justice (ओंटारिओ सुपीरियर न्यायालय) लंडन शहरामध्ये जानेवारी 28, 2009 रोजी सकाळी 10:00 वाजता, Superior Court of Québec (क्युबेक सुपीरियर न्यायालय) मॉंट्रियल शहरामध्ये मार्च 9 व -10, 2009 रोजी सकाळी 9:00 वाजता, आणि Supreme Court of British Columbia (ब्रिटिश कोलंबियाचे सर्वोच्च न्यायालय) व्हॅंकुवर शहरामध्ये फेब्रुवारी 27, 2009 रोजी सकाळी 10:00 वाजता सुनावणी घेईल. समझोत्याच्या क्लासच्या सदस्यांना सुनावण्यांना उपस्थित राहून कॅनेडियन समझोता करारासंबंधी आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे.

(परत वर जा)

अंतिम मान्यता सुनावणीला क्लास सदस्यांनी उपस्थित राहिलेच पाहिजे काय ?

नाही, अंतिम मान्यता सुनावणीला क्लास सदस्यांनी उपस्थित राहिलेच पाहिजे असे नाही. तथापि, आपली उपस्थित राहण्याची इच्छा असेल तर आपण यात दिलेल्या बाबींची पूर्तता केली पाहिजे सूचना. पहा मी सेटलमेंटवर शेरे कसे मारू शकेन वा हरकती कशा घेऊ शकेन ?

(परत वर जा)

मी सेटलमेंटवर शेरे कसे मारू शकेन वा हरकती कशा घेऊ शकेन ?

अमेरिकन सेटलमेंट:

Lufthansa समझोत्याच्या क्लासमधून आपण नाव वगळण्याची विनंती न केल्यास आपण Lufthansa समझोत्याच्या क्लासमध्ये राहू शकता व दाव्याचे प्रपत्र सादर करु शकता, पण त्याचवेळी Lufthansa समझोत्याच्या कोणत्याही भागावर आक्षेप घेऊ शकता. आक्षेप दाखल करण्याची अंतिम मुदत नोव्हेँबर 12, 2008 आहे.

आपण Lufthansa समझोता करारातून निष्कासनाची विनंती केली नसल्यास जर आपण समझोत्यावर आक्षेप घेतला तर आपण स्वतः अगर वकिलामार्फत (आपल्या खर्चाने) न्याय्यता सुनावणीला हजर राहून न्यायालय जे योग्य व सुसंगत समजेल ते पुरावे आणि युक्तिवाद सादर करु शकता.

न्यायालयाने आपल्या आक्षेपांवर विचार करायचा असल्यास आपण खालील गोष्ती असलेला लेखी आक्षेप सादर केला पाहिजे:

  • हजर राहण्याची इच्छा असल्याची नोटीस ;
  • Lufthansa समझोत्याच्या क्लासच्या सदस्यत्वाचा पुरावा ; व
  • आक्षेपाचे निश्चित मुद्दे व आपल्याला हजर राहून युक्तिवाद का करावयचा आहे याची कारणे, तसेच न्यायालयाने विचार करावा असे आपल्याला वाटत असलेले सर्व कागदपत्र व साहित्य.

असे लेखी आक्षेप नोव्हेँबर 12, 2008 पूर्वी न्यायालयात सादर करावे तसेच समझोत्याच्या क्लासच्या वकिलांना व Lufthansa च्या वकिलांना खाली दिलेल्या पत्त्यांवर टपालाने पाठवावे. जो कोणी या पद्धतीने आक्षेप घेऊ शकणार नाही त्याने सर्व आक्षेपांचा अधित्याग केल्याचे मानले जाईल व अन्यथा त्याला न्यायालयाने चांगल्या उद्देशासाठी माफी केल्याशिवाय त्याला ऍक्शनमध्ये अगर अन्य कोणत्याही कृती अथवा कारवाईत असे आक्षेप घेण्यास कायमची बंदी होईल.

न्यायालय:

Clerk of the Court
United States District Court
Eastern District of New York
225 Cadman Plaza East
Brooklyn, NY 11201

Lufthansaचे वकीलl:

Eric J. Mahr
Natalya K. Scimeca
WILMER CUTLER PICKERING HALE AND DORR LLP
1875 Pennsylvania Avenue, N.W.
Washington, D.C. 20006

समझोत्याच्या क्लासचे वकील:
Michael D. Hausfeld
HAUSFELD LLP
1700 K Street, NW
Suite 650
Washington, DC 20006

Robert N. Kaplan
KAPLAN FOX & KILSHEIMER LLP
850 Third Avenue
New York, NY 10022

Henry A. Cirillo
THE FURTH FIRM LLP
225 Bush Street, 15th Floor
San Francisco, CA 94104

Steven N. Williams (SW-6198)
COTCHETT, PITRE & MCCARTHY
840 Malcolm Road, Suite 200
Burlingame, CA 94010
Hollis Salzman
LABATON SUCHAROW LLP
140 Broadway
New York, NY 10005

Howard J. Sedran
LEVIN, FISHBEIN, SEDRAN & BERMAN
510 Walnut Street
Philadelphia, PA 19106

W. Joseph Bruckner
LOCKRIDGE GRINDAL NAUEN P.L.L.P.
100 Washington Avenue South, Suite 2200
Minneapolis, MN 55401

Christopher Lovell
LOVELL STEWART HALEBIAN LLP
500 Fifth Avenue, Suite 58
New York, NY 10110

कॅनेडियन सेटलमेंट:

आपल्याला समझोत्याबद्दल मतप्रदर्शन करायचे असेल अगर आक्षेप नोंदवायचा असेल तर आपले लेखी म्हणणे खाली दिलेल्या प्रत्येक वकिलास नोव्हेंबर 12, 2008 पर्यंत पोहोचवले पाहिजे:

क्युबेक समझोत्याच्या क्लासचे सदस्य सोडून अन्य समझोत्याच्या क्लासच्या सदस्यांचे आक्षेप कॅनेडियन समझोत्याच्या क्लासच्या सहवकिलांकडे पाठवावे:

Charles M. Wright
Siskinds LLP
680 Waterloo Street
London, ON N6A 3V8
1-800-461-6166

क्युबेक समझोत्याच्या क्लासच्या सदस्यांचे आक्षेप क्युबेक समझोत्याच्या क्लासच्या वकिलांकडे पाठवावे:

Irwin Liebman
Liebman Associés
1 Westmount Square #1500
Montreal, Québec H3Z 2P9
(514) 846-0666
Robert E. Kwinter
Blake, Cassels & Graydon LLP
199 Bay Street
Suite 2800, Commerce Court West
Toronto, ON M5L 1A9
(416) 863-2400

Deutsche Lufthansa AG, Lufthansa Cargo AG, आणि Swiss International Air Lines Ltd. साठीचे कॅनेडियन वकील

सर्व लिखित जबाब योग्य त्या न्यायालयाला पाठवले जातील व सर्व मिळालेल्या लिखित जबाबांवर योग्य त्या न्यायालयाद्वारे विचार होईल. आपण नोव्हेंबर 12, 2008 पूर्वी लिखित जबाब सादर केला नाही तर आपल्याला समझोत्याच्या मान्यतेच्या सुनावण्यांमध्ये तोंडी जबाब अगर अन्य पद्धतीने भाग घेण्याचा अधिकार राहणार नाही.

(परत वर जा)

सेटलमेंटबद्दल मला अधिक माहिती केव्हा मिळू शकेल ?

जर आपल्या प्रश्नाचे उत्तर या वेबसाईटवर आढळले नाही तर, आपण Air Cargo Settlement (हवाई मालवाहतुक समझोता) विषयक दाव्यांच्या शी इमेलने संपर्क साधू शकता: administrator@aircargosettlement.com. आपण Air Cargo Settlement (हवाई मालवाहतुक समझोता) विषयक दाव्यांच्या प्रशासकांशी दूरध्वनीद्वारेही संपर्क साधू शकता: अमेरिका व कॅनडामध्ये आपण या विनामूल्य दूरध्वनीवर कॉल करु शकता: 1 (800) 749-3518. अमेरिका अगर कॅनडाच्या बाहेरून जर आपण या विनामूल्य दूरध्वनीवर कॉल केला तर मूल्य द्यावे लागते. अमेरिका व कॅनडाव्यतिरिक्त इतर ठिकाणांहून आपण या दूरध्वनीवर कॉल करु शकता: 1 (941) 906-4822. या दूरध्वनीवर कॉल केल्यास त्याचे पैसे द्यावे लागतात. जोडलेली हवाई मालवाहतूक समझोता दाव्यांच्या व्यवस्थापकांच्या टोलमुक्त व टोलयुक्त दूरध्वनी क्रमांकांसाठीची देशवार सूची पहा. Air Cargo Settlement (हवाई मालवाहतुक समझोता) दाव्यांच्या व्यवस्थापकांना खालील पत्त्यावर पत्रही लिहू शकता:

Air Cargo Settlement
c/o The Garden City Group, Inc.
PO Box 9162
Dublin, OH 43017-4162 USA

जर आपल्याला सूचना किंवा Lufthansa Settlement Agreements, बाबत प्रश्न असतील तर आपण कोणत्याही Settlement क्लास वकिलाशी वर दिलेल्या पत्त्यावर पत्र लिहून.संपर्क साधू शकता.

(परत वर जा)

जर माझा पत्ता बदलला असेल तर मी तो अद्ययावत कसा करावा ?

जर आपला पत्ता दावा प्रपत्रावर आधी छापलेल्या पत्त्यापेक्षा वेगळा झाला असेल वा बदलला असेल तर कृपया, या वेबसाईटवर आपली सध्याची माहिती नोंदवा, किंवा ती Air Cargo Settlement (हवाई मालवाहतुक समझोता) विषयक दाव्यांच्या कडे या पत्त्यावर पाठवा:

Air Cargo Settlement
c/o The Garden City Group, Inc.
PO Box 9162
Dublin, OH 43017-4162 USA

(परत वर जा)

सेटलमेंटस् मध्ये वकिलांना किती रक्कम दिली जाईल ?

अमेरिकन सेटलमेंट:

आजच्या तारखेपर्यंत या ऍक्शनमध्ये वादी व प्रस्तावित क्लासचे (Lufthansa समझोत्याच्या क्लाससहित) प्रतिनिधित्व करणार्या वकिलांना त्यांच्या सेवांसाठीचे पैसे अगर खर्चाची परतफेड मिळालेली नाही. आधी नमूद केल्यानुसार वकिलांच्या फीचे व खर्चाचे पैसे देण्यासाठी आपण वैयक्तिकरीत्या जबाबदार नाही. वकिलांच्या वेळेची किंमत व खटला चालवण्यातील धोक्याची भरपाई साठी एकत्रित तत्कार्यनुरूप फी यासाठी समझोत्याच्या क्लासचे वकील न्यायालयाला वकिलांच्या फीबद्दल अधिनिर्णय करण्याची विनंती करतील – जी रक्कम Lufthansa समझोता निधीमधून वजा करायची आहे – त्यांना वकिलांच्या फीबद्दल Lufthansa समझोता निधीच्या 30 % रकमेपेक्षा जास्त दिली जावू नये, तसेच खटल्याचा प्रत्यक्ष खर्च म्हणून दिलेला परतावा 2.5 लक्ष डॉलरपेक्षा जास्त दिला जाऊ नये.

कॅनेडियन सेटलमेंट:

कॅनेडियन समझोत्याच्या क्लासच्या वकिलांची फी, वितरण व कर हे न्यायालयांद्वारे ठरवले जातील व ते कॅनेडियन समझोता निधीमधून दिले जातील. कॅनेडियन समझोत्याच्या क्लासच्या वकिलांच्या फीची प्रस्तावित रक्कम कॅनेडियन समझोता निधीच्या 25 %, अधिक ज्या दिवशी न्यायालये समझोत्यास मान्यता देतील तोपर्यंतची झालेली वितरणे व भरलेले कर या पेक्षा जास्त नसेल. याशिवाय, कॅनेडियन समझोत्याच्या क्लासचे वकील, कॅनेडियन समझोता निधीमधून कोणत्याही भविष्यकालीन विरोधी खर्चापोटी अधिकतम 500,000 कॅनेडियन डॉलरपर्यंत व भविष्यकालीन वितरणांपोटी अधिकतम 500,000 कॅनेडियन डॉलरपर्यंत अदायगी करण्याविषयी न्यायालयांमध्ये प्रस्ताव आणण्याचे अधिकार राखून ठेवत आहेत.

(परत वर जा)

कॅनेडियन सेटलमेंटच्या प्रशासनासंबंधी अद्यतने प्राप्त करण्यास मी कशा प्रकारे नोंदणी करू ?

आपल्याला ही नोटीस टपालाने आली असेल तर पुढील माहिती आपल्याला खात्रीशीरपणे टपालाने पाठवली जाण्यासाठी आपण काहीच करण्याची आवश्यकता नाही. मात्र आपल्याला ही नोटीस टपालाने आली नसेल, तर कॅनेडियन समझोता निधीच्या कोणत्याही भावी वितरणासहित पुढील माहिती आपल्याला खात्रीशीरपणे टपालाने पाठवली जाण्यासाठी आपण दावे प्रशासकाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.

आपण या संकेतस्थळावर अशी नोंदणी करू शकता ऑनलाईन नोंदणीप्रपत्र पूर्ण करुन, किंवा डाऊनलोड करुन व ते या पत्त्यावर पाठवून:  Air Cargo Settlement, c/o The Garden City Group, Inc., P.O. Box 9162, Dublin, OH 43017-4162 USA. नोंदणी करण्यासाठी आपण Air Cargo Settlement (हवाई मालवाहतुक समझोता) ला दूरध्वनीही करु शकता: अमेरिका किंवा कॅनडा(विनामूल्य) 1 (800) 749-3518 ; किंवा आंतरराष्ट्रीय (मूल्यसहित) 1 (941) 906-4822. Air Cargo Settlement (हवाई मालवाहतुक समझोता) टोल-मुक्त व टोल-युक्त दूरध्वनी क्रमांकांची देशवार यादी या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच आपण नोंदणी प्रपत्र मागवण्यासाठी येथे दिलेल्या पत्त्यावर Air Cargo Settlement (हवाई मालवाहतुक समझोता) च्या दावे प्रशासकाला पत्रही लिहू शकता.

(परत वर जा)