(India : ठिकाण बदला)
संक्षिप्त आढावा
आपण जर जानेवारी 1, 2000 ते सप्टेंबर 11, 2006 या काळात अमेरिका किंवा कॅनडा या देशांमधील किंवा, या देशांकडे जाणा-या किंवा या देशांमधून निघणा-या एअर कार्गो शिपींग सर्व्हिसेस घेतलेल्या असतील तर आपल्या हक्कांना एका वा अधिक प्रस्तावित क्लास ऍक्शन तोडग्यांचा फटका बसण्याची शक्यता आहे. कोणत्याही कार्गो कॅरिअरकडून, आपण अमेरिका किंवा कॅनडा या देशांमधील अंतर्गत किंवा, या देशांकडे जाणा-या किंवा या देशांमधून निघणा-या एअर कार्गो शिपींग सर्व्हिसेस घेतलेल्या असतील तर आपण क्लास सदस्य आहात. यामध्ये फ्रेट फॉरवर्डर्सकडून घेतलेल्या सेवांचाही समावेश आहे. अमेरिका आणि कॅनडा यांमधील तोडगे वेगवेगळे असणार आहेत. दोन्ही तोडग्यांमध्ये आपण क्लास सदस्य असू शकणार आहात.
या तोडग्यांमुळे अमेरिका व कॅनडातील कायदेशीर खटले आंशिकरीत्या कमी होणार आहेत. फिर्यादींचा दावा असा आहे की इतर असंख्य एअर कार्गो कॅरिअर्सना साथीला घेऊन Deutsche Lufthansa AG, Lufthansa Cargo AG व Swiss International Air Lines Ltd. ("Lufthansa"), यांनी, अमेरिकेचे अँटीट्रस्ट कायदे आणि कॅनडाचा स्पर्धा कायदा यांचा भंग करून एअर कार्गो शिपींग सर्व्हिसेसच्या किंमती ठरवण्याचा कट केला. वादींचा आरोप आहे की या कथित वर्तनाचा परिणाम म्हणून क्लासला हवाई मालवाहतूक सेवांसाठी हा कट नसताना जो खर्च आला असता, त्यापेक्षा जास्त खर्च आला. तोडग्यांमध्ये एक पक्ष म्हणून प्रवेश केल्याने या कथित बेकायदेशीर वर्तनात आपण सामील होतो हे मान्य केलयासारखे होते याचे Lufthansa ने खंडन केले आहे आणि खटला पुढे चालविला गेला तर वादींच्या दाव्यापुढे अनेक बचाव मांडता येतील असे स्पष्ट केले आहे. तथापि, खर्च, ओझी आणि पुढील न्यायालयीन लढाई टाळणे तसेच आपल्या अमूल्य व्यापारी ग्राहकांबरोबरची ही वादग्रस्तता निकालात काढण्याच्या दृष्टीने तोडग्यात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे Lufthansaने म्हटले आहे.
अमेरिकेमधील, अमेरिकेतून निघणा-या आणि अमेरिकेत जाणा-या, एअरफ्रेट कार्गो शिपींग सर्व्हिसेसच्या संबंधातील दाव्यांच्या सोडवणुकीसाठी Lufthansaने 85 कोटी अमेरिकन डॉलर वैध क्लास सदस्यांच्या दाव्यात देण्याचे तसेच अमेरिकन तोडग्याचा भाग नसलेल्या उर्वरित बचाव पक्षांविरूद्धच्या दाव्यांच्या खटल्यात सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. कॅनडामधील, कॅनडातून निघणा-या आणि कॅनडात जाणा-या, एअरफ्रेट कार्गो शिपींग सर्व्हिसेसच्या संबंधातील दाव्यांच्या सोडवणुकीसाठी Lufthansaने 5,338,000 अमेरिकन डॉलर कॅनेडियन फंडात देण्याचे मान्य केले आहे व हा फंड कॅनेडियन क्लास वकील भविष्यातील कॅनेडियन क्लासेसच्या फायद्यासाठी ट्रस्टकडे दिला जावा अशी विनंती करणार आहेत.
ही माहिती केवळ सारांश आहे. अधिक तपशीलासाठी, कोण क्लास सदस्य आहे व कोण नाही, तोडग्याच्या निधीचे वितण आणि अमेरिकन तोडग्यासाठी दावा कसा सादर करावयाचा, क्लास सदस्य पर्याय आणि कृती करण्याच्या अंतिम मुदती, अंतिम मान्यतेसाठीच्या सुनावणींची ठिकाणे, आणि इतर महत्त्वाची माहिती, यासाठी कृपया सूचनेचा आढावा घ्या.
कृपया न्यायालयांशी संपर्क साधू नका
महत्वाचे अद्यतनः न्यायालयाने अमेरिकन समझोत्यास अंतिम मान्यता दिलेली आहे.
अमेरिकन अगर कॅनेडियन समझोत्यांमधून स्वतःला निष्कासित कसे करावे किंवा समझोत्यावर मतप्रदर्शन कसे करावे अथवा आक्षेप कसा घ्यावा याची अंतिम मुदत संपली आहे.
दाव्याच्या प्रपत्रांची अंतिम मुदत संपली आहे.
| दिनांक | क्लासशी संबंधित घटना |
|---|---|
| 12 नोव्हेंबर, 2008 | अमेरिकन आणि कॅनेडियन तोडग्यांमध्ये बाहेर काढले जाण्याची अंतिम मुदत(पोस्टमार्क डेडलाईन) |
| 12 नोव्हेंबर, 2008 | अमेरिकन आणि कॅनेडियन तोडग्यांमध्ये हरकत सादर करण्याची अंतिम मुदत |
| डिसेंबर 12, 2008 सकाळी 11:30 वाजता |
United States District Court, Eastern District of New York (अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयाच्या न्यूयॉर्कच्या पूर्व जिल्ह्याचे न्यायालय) येथे अंतिम मान्यता सुनावणी |
| जानेवारी 28, 2009 सकाळी 10:00 वाजता |
Ontario Superior Court of Justice (ओंटारिओचे सुपीरियर न्यायालय) येथे अंतिम मान्यता सुनावणी |
| 12 फेब्रुवारी, 2009 | पोस्टमार्क डेडलाईन दावा प्रपत्र |
| फेब्रुवारी 27, 2009 सकाळी 10:00 वाजता |
Supreme Court of British Columbia (ब्रिटिश कोलंबियाचे सर्वोच्च न्यायालय) येथे अंतिम मान्यता सुनावणी |
| मार्च 9-10, 2009 सकाळी 9:00 वाजता |
Québec Superior Court (क्युबेकचे सुपीरियर न्यायालय) येथे अंतिम मान्यता सुनावणी |
